आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने शेअर मार्केट म्हणजे काय ते पाहणार आहोत.
शेअर मार्केटला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार अस देखील बोललात.
शेअर मार्केट मध्ये दोन शब्द येतात शेअर आणि मार्केट आपण या दोन्ही शब्दांचे अर्थ नीट मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये समजून घेऊयात आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट म्हणजे काय ते नेमकं ते पाहूया.
मार्केट :-
मार्केट मराठी शब्द आहे बाजार जिथे वस्तूंची खरेदी-विक्री होते वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट असतात जस की कपड्यांचं मार्केट , मच्छी मार्केट , भाजीपाला मार्केट वगैरे वगैरे असतील .
आता तुम्हाला समजल असेल मार्केट म्हणजे काय . इथे वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करतो आणि विकतो .
शेअर :-
शेअरचा मराठी मध्ये अर्थ हिस्सा असा होतो . आता हा हिस्सा नक्की कोणाचा असतो ? तर हा हिस्सा वेगवेगळ्या मोठ्या असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा .
या कंपन्यांना जेंव्हा पैशांची गरज असते , तेव्हा ते मार्केट मध्ये येतात , आपले काही शेअर्स विकून ते पैसे घेऊन जातात .
उदाहरण देयच झालं तर टाटा खूप मोठी कंपनी आहे . आता टाटाला तिच्या नवीन प्रोजेक्ट साठी समजा एक लाख रुपयांची गरज आहे . आता टाटाचा Manager तुमच्याकडे आला आणि मनाला की आम्हाला २००० रुपयांची गरज आहे , आम्हाला २००० रुपय द्या आणि आमच्या कंपनीचे २% शेअर्स घ्या , तुम्ही पण सहमती दर्शवली आणि २००० रुपेय देऊन त्या कंपनीचे २% मालक झालात .
आता मित्रानो इथे तुम्ही जे २% विकत घेतले त्याला म्हणतात शेअर म्हणजेच हिस्सा .
शेअर मार्केट :-
शेअर मार्केट अशी जागा आहे जिथे शेअर्स ची खरेदी विक्री केली जाते . इथे तुमच्या सारखे लोक येतात जे वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री करतात .
आता तुमच्याकडे टाटा च्यां नव्या कंपनीचे २% शेअर्स आहेत , ज्याची किंमत २००० रुपय आहे. टाटाच्या नव्या कंपनीने चांगला व्यापार केला , आणि खूप प्रोजेक्ट केले , त्यामुळे त्यांचा खूप चांगला नफा झाला , ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांच्या कंपनीची पहिला एक लाख किंमत होती ते आता दोन लाख रुपये झाली म्हणजे तुमच्या दोन हजार रुपयाच्या शेअरची किंमत चार हजार रुपये झाली म्हणजे दोन हजार रुपये वाढले.
आता तुम्हाला तुमचे शेयर्स विकायचे आहेत मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये जाता आणि घोषणा करतात की माझ्याकडे टाटा कंपनीचे चार हजार रुपयांचे शेअर्स आहेत कोणाला विकत घ्यायचे आहेत का तिथे एका व्यक्तीने तुमची ही घोषणा ऐकली आणि त्याने विचार केला की टाटाची ही नवीन कंपनी कंपनी आहे आणि भविष्यात या कंपनीच्या शेअरची किंमत नक्की वाढेल तेव्हा त्या व्यक्तीने तुमच्याकडून ते चार हजार रुपयांमध्ये विकत घेतले आता तुमच्या चांगला फायदा झाला काल तुम्हाला दोन हजार रुपयांचा फायदा त्या मुळे झाला आणि भविष्यकाळात त्या शेअरची किंमत कमी होईल त्या व्यक्तीचा नफा-तोटा अवलंबून
मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेल की शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री होते तुम्ही अजून जर खोला जाल तर शेअर मार्केट मध्ये भरपूर नवीन गोष्टी आहेत , जे आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये ह्या वेबसाईटवर बघणार आहोत तुम्हाला हे आर्टिकल कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका .
शेअर मार्केट मध्ये डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा