मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता हरपला, विनायक मेटेंचा प्रवास थक्क करणारा प्रवास

मराठा समाजासाठी रात्रंदिवस झटणारे समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी काय रस्त्यावरची लढाई करणारे नेते शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन

मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे आज सकाळी रायगड जिल्ह्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात निधन झाले. अपघातस्थळावरील दृश्यांमध्ये त्यांची कार गंभीररित्या खराब झालेल्या अवस्थेत दिसून आली.

30 June 1970 रोजी सामान्य कुटूंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या नावावर  केलें  आहे.

बीड जिल्ह्यातील राजेगाव (ता. केज) या खेडेगावचे ते रहिवाशी होते. त्यांनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली यावेळी मराठा महासंघाशी त्यांचा संबंध आला. आणि यातूनच त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली.

पहिल्या युती सरकारच्या काळात म्हणजे 1995 साली त्यांना विधान परिषदेवर पहिल्यांदा संधी मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली.

सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणून ते काम पाहिले आहे.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही घटना असेल तर त्यांच्याशी जोडली जायची. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत.

मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली