Founder of Paytm Vijay Shekhar Sharma biography in marathi | paytm चे संस्थापक विजय शर्मा जीवन परिचय मराठी मध्ये

 विजय शर्मा

एक काळ असा होता की खायला घेण्यासाठी खिशात पैसे नव्हते , आज 18 हजार करोड चे मालक पेटीयम चे फाउंडर श्री विजय शेखर शर्मा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास .

या वाक्याला चरितार्थ करण्याचं काम पेटीएम ( Paytm ) चे संस्थापक श्री विजय शेखर शर्मा यांनी केले . आपल्या मेहनतीने आणि नव्या विचार प्रणाली ने आपल्या संघर्षमय जीवनाचा प्रवास लिहिला आहे . विजय शेखर शर्मानी आपल्या सफलते च्या शिखरावर पोहोचण्याचा संघर्षमय जीवन प्रवास आज आपण पाहणार आहोत .

अलिगड चे राहणारे विजय शर्मा कधी दिल्लीच्या रस्त्यांवर पुस्तकांसाठी भटकायचे . खूप वेळा तर त्यांच्याकडे खायला घेण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसायचे . इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना खूप वेळा अपमान सहन करावा लागला , तरी पण त्यांनी आपल्या मेहनतीने आपल्या दुरगामी विचाराने नव्या योजनेची महणजेच कंपनीची सुरुवात केली ज्याच्यामुळे त्यांची कंपनी पेटीएम आज सफळतेच्या शिखरावर पोचली आहे.

आज ते अठरा हजार करोड पेक्षा अधिक रुपयांचे मालक बनले आहे . श्री विजय शेखर शर्मा यांच्यासाठी जमिनीपासून ते उंच आकाशामध्ये झेप घेऊन सक्सेसफुल होण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता चला तर त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊया .

विजय शेखर शर्मा यांचं शिक्षण :-

7 जून 1978 ला उत्तर प्रदेश मधील अलिगड च्या एका मध्यवर्गीय परिवारामध्ये श्री विजय शेखर शर्मा यांचा जन्म झाला . विजय शेखर शर्मा हे लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार होते . विजय शर्मा यांचे सुरुवातीचे शिक्षण हिंदी माध्यम स्कूल मधून झालं होतं , विजय शर्मा नेहमी वर्गामध्ये पहिले याचे .

आपल्या क्षमतेच्या हिमतीवर 14 वर्षाच्या वयात त्यांनी बारावी पास केली होती . विजय शर्मा यांनी पुढच्या शिक्षणासाठी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये ऍडमिशन केलं होतं . ऍडमिशन तर मिळाला , पण पुढचा प्रवास काही सोपा नव्हता .

सुरुवातीपासूनच हिंदी मीडियम मध्ये शिकलेले विजय शर्मा इंग्रजी मध्ये थोडे कच्चे होते . त्यामुळे त्यांना कॉलेजच्या दिवसांमध्ये खूप समस्यांना सामोरे जावे लागले . हिंदी मिडीयम मध्ये हुशार असणारे विजय शर्मा यांना कॉलेजच्या अभ्यासामध्ये खूप समस्या येऊ लागल्या होत्या त्यामुळे ते कॉलेजमध्ये अनुपस्थित राहायला लागले .

अश्या प्रकारे इंग्रजी शिकून घेतली :-

या काळात विजय , जॅक मा यांच्यापासून खूप इन्स्पायर होऊन इंटरनेटच्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काहीतरी करणार असं ठरवलं . Yohoo ची वेबसाईट स्टॅनफोर्ड कॉलेजमध्ये बनवलेली होती . त्यामुळे विजय तेथे जाऊन शिकण्याची इच्छा व्यक्त करत होते . पण आपल्या फायनान्शिअल कंडिशन आणि इंग्लिश मध्ये कमी नॉलेज मुळे त्यांचे ते स्वप्न अपूर्ण राहिल .

इंग्रजी न येण्याच्या कारणांमुळे विजय शेखर शर्मा यांनी शिक्षण सोडण्याचा विचार मनामध्ये खूप वेळा केला होता . पण त्यांनी पुन्हा ठरवलं की इंग्रजी शिकायचं . विजय यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने इंग्रजी शिकण्याचा एक नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते .

त्यांनी इंग्रजी शिकण्याची नवी पद्धत पण शोधली ते एका पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजी वर्जन विकत घ्यायचे आणि दोन्ही पुस्तके एकाच वेळी वाचायचे . क्लासेस अटेंड करत नसल्यामुळे त्यांच्याकडं खूप वेळ होता . ते त्या वेळेचा उपयोग पुस्तक वाचण्यासाठी मध्ये करायचे . आपल्या इच्छाशक्तीच्या हिमतीवर त्यांनी लवकरच इंग्रजीवर पकड मिळवली .

पहिल्या कंपनी ची सुरुवात :-

श्री विजय शेखर शर्मा दिल्लीतील संडे बाजारांमध्ये फिरायचे . खूप वेळा तर त्यांना खायला घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे तरी पण ते कुठून पण पैसे मिळून फॉर्च्यून या पोस्टर्स सारखी मॅक्झिन च्या जुन्या कॉपीज विकत घ्यायचे . अशाच एका मॅक्झिन मधून त्यांना अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये एक गैराज सुरू होणारी कंपनी बद्दल माहिती मिळते .

याच्या नंतर ते अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी गेले . तेथे त्यांना माहिती झालं की भारतामध्ये स्टार्टअप साठी कोणताही सपोर्ट नव्हता , मग ते पुन्हा भारतात येऊन त्यांनी आपल्या बचत मधल्या पैशांमधून आपल्या बिजनेस ची सुरुवात केली त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम indiasite.net बनवलं , ज्यामध्ये इंवेस्टर्स नी पैसा लावला होता दोन वर्षानंतर त्याला विकून मिळालेल्या एक मिलियन डॉलर पासून विजय यांनी one 97 communication Ltd. नावाचं मोबाईल वैल्यू अडेड सर्विस देणारी कंपनी उघडली.

कंपनी बुडाली तरीपण हिमत हारली नाही :-

श्री विजय शर्माजी ची पहिली कंपनी अमेरिकेच्या 9/11 त्रासदी कारण बंद पडली . विजय शर्मा यांचे पैसे संपले होते आणि आपल्या जीवनातील सर्व सोयी सुविधांचा त्यांना त्याग करावा लागला होता . विजय कार सोडून बस मधून प्रवास करायला लागले होते . एक वेळ अशी होती की पैसे वाचवण्यासाठी प्रवास पायी चालत करावा लागला होता .

कधी कधी तर असे पण वेळ होती की विजय यांना भूक भागवण्यासाठी दिवसातून फक्त दोन कप चहा वरच राहावं लागलं होतं पण त्यांनी आपलं स्वप्न पाहणं सोडत नव्हत आणि पैशांच्या तंगी मुळे कन्सल्टंट एक जागी नोकरी करावी लागली .

पेटीएमची सुरुवात अशी झाली :-

काम करत असताना श्री.विजय शेखर शर्मा यांच्या लक्षात आले की आगामी काळात स्मार्टफोनचा ट्रेंड झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतील, असे काही तरी का करत नाही. या विचाराने त्यांनी One97 Communications Ltd अंतर्गत Paytm.com नावाची वेबसाइट उघडली आणि ऑनलाइन मोबाइल रिचार्ज सुविधा सुरू केली.

पेटीएमच्या सुविधेमुळे ते लवकरच लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. जेव्हा पेटीएमचा व्यवसाय वाढला तेव्हा विजयने पेटीएम डॉट कॉममध्ये ऑनलाइन वॉलेट, मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर आणि खरेदीची वैशिष्ट्ये जोडली. लवकरच, पेटीएम हे भारतातील सर्वात मोठे मोबाइल पेमेंट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनले.

Paytm सह यश मिळवा :-

श्री विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमच्या यशाने त्यांची स्वप्ने उंचावली. नोटाबंदीने पेटीएमला जमिनीपासून आकाशापर्यंत नेले. लवकरच पेटीएम करोडो लोकांची गरज बनली. सध्या पेटीएम भारतभर आपली सेवा देत आहे. आज पेटीएम ही भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन पेमेंट साइट आहे आणि तिचा एकूण व्यवसाय 25000 कोटींहून अधिक आहे.

ज्यांना आपल्या मेहनतीच्या जोरावर काहीतरी बनायचे आहे त्यांच्यासाठी विजय हा एक आदर्श आहे. श्री विजय शेखर शर्मा यांनी आपल्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर एक नवीन यशोगाथा लिहिली आहे. ते आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. खूप लोक श्री विजय शेखर शर्मा जी यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या दूरगामी विचाराचे मनापासून कौतुक करते.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi