जवाहर मोरे यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास | Javahar More biography in Marathi

नमस्कार मित्रानो आज आपण एका अश्या व्यक्तीची biography पाहणार आहोत हे, आवडीने शिक्षक, योगायोगाने ॲक्टर, लेखक आणि समाजसेवक आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे जवाहर मोरे यांच्याबद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत.

जवाहर मोरेे यांचे प्रारंभिक जीवन

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे जवाहर मोरेे यांचा जन्म वाटंबरे ता. संगोल्यात एका मध्मवर्गीय कुटुंबामध्ये ११/०६/१९७६ रोजी झाला होता. लहानणापासूनच त्यांना शिक्षणाची फार आवड होती त्यामुळे त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २००३ पासून संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रुप येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

जवाहर मोरेे यांचे शिक्षण

घरातील परीस्थिती बरी असल्याने त्यांचे शालेय शिक्षण आनंदात गेले.एकुलता एक मुलगा मुलगा असल्याने वडिलांची मुलाने शिकावे… मोठे व्हावे… हि ईच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्यांचं शिक्षण पदव्युत्तर पर्यंत केलं. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण – जि.प.प्राथमिक शाळा , वाटंबरे , माध्यमिक शिक्षण – श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यु.कॉलेज , वाटंबरे, पदवी शिक्षण – सांगोला महाविद्यालय, सांगोला ,पदव्युत्तर शिक्षण – शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर ,बी.एड्. – शिक्षणशास्त्र महाविद्यालय , विटाएम.फील्. – संगमेश्वर कॉलेज , सोलापूर मधून केलं होत.

मोरे सर शिक्षकाच्या भूमिकेत

सरांनी शिक्षक व्हायचं हे अगोदरच ठरवल्यामुळेच सध्या प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. ते 2003 पासुन भीमराव पाटील महावद्यालय, मंदृप येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचे मत असे आहे की , प्राध्यापकी पेशासोबत आणखी काही तरी असावं म्हणून मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थेमध्ये काम करीत आहे.त्याचबरोबर हास्यखजिना नावाचा दोन तासाचा विनोदी प्रयोग ते सादर करीत आहे. आजपर्यंत हास्यखजिना चे २०० च्या आसपास राज्यभर प्रयोग झाले आहेत. शिवाय युट्यूब चँनलच्या माध्यमातून जनजागृती , प्रबोधन नेहमीच सर करत आले आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने ही त्यांनी दिली आहेत.

 • पदे
 • १) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक
 • २) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव आयोजन समिती सदस्य
 • ३) महाराष्ट्र साहित्य परीषद आजीव सदस्य

जवाहर मोरे सर ॲक्टरच्या भूमिकेत

लहानपणापासूनच त्यांना अक्टिंग ची फार आवड होती. त्यामुळे ते नेहमीच आपल्या शाळेच्या इयत्ता आठवीमध्ये शाळेच्या गँदरींगमध्ये एकांकीकेत भाग घेतला होता. त्यांचा अभिनय शिक्षक , मित्र , ग्रामस्थ यांना खूप आवडला. त्यामुळे ते दरवर्षी गँदरींगमध्ये एकांकीकेत भाग घेत राहिले . तेव्हापासून त्यांनी अभिनय हा छंद जोपासत गेले. संधी मिळेल तिथे अभिनयाचा विकास त्यांनी केला म्हणून तर

 • नमो या मराठी चित्रपटात सावकाराची भुमिका केली आहे
 • महासुर्य चित्रपटात शिक्षकाची भुमिका केली आहे
 • माझं काय चुकलं या लघुपटात वडिलांची भुमिका केली आहे
 • प्रेमार्थ या लघुपटात शिक्षकाची भुमिका केली आहे.

मोरे सर समाजसेवक भूमिकेत

वेगवेगळ्या सामाजिक , सांस्कृतिक , साहित्यिक कार्यक्रमात अनुक्रमे व्याख्याने , सुत्रसंचालन ,निवेदन , कथाकथन व काव्यवाचन सरांनी केले आहे. कोरोना , लसीकरण व माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर गीतं लीहून त्यांच्याच आवाजात सादर केली आहेत. दरवर्षी वृक्षारोपण करतात. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भामरागड जि. गडचिरोली येथील आदिवासी लोकांना कपडे संकलन करुन सरांनी पाठवले आहेत. सामाजिक कार्य १) गणेशोत्सव सहभाग २) महापुरुषांच्या जयंती उपक्रमात सहभाग ३) २ महिला बचत गटाची स्थापना४) स्वामी समर्थ पतसंस्था शाखा मंद्रुपचा संचालक ५) आधार प्रतिष्ठान ,सोलापूर या संस्थेचा सचिव ६) दरवर्षी महिला दिन व कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध उपक्रम व दरवर्षी रक्तदान करतात.

सरांना मिळालेले पुरस्कार

 • नेहरु युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार
 • शब्दांकूर प्रतिष्ठान माळशिरस चा शब्दश्री पुरस्कार
 • लोकराज्य सेवाभावी संस्था लातूरचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
 • लायन्स क्लब ऑफ मंद्रुप चा गुणवंत शिक्षक पुरस्का
 • दै.सांगोला नगरी परीवाराचा सांगोला नगरी गौरव पुरस्कार
 • अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ, सोलापूर चा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
 • महाराष्ट्र शासनाचा रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार
 • पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठाचा रा.से.यो.उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार इ. पुरस्कार सरांन मिळाले आहेत.

जवाहर मोरे जी यांनी आपल्या धैर्याने आणि तळमळीने हे सिद्ध केले आहे की मनाचा पराभव हा मनाचा विजय असतो. आज ते लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी यशोगाथा लिहिली आहे. जवाहर मोरे जी यांच्या अद्भूत कार्याचे आणि धैर्याचे मनापासून कौतुक.

1 thought on “जवाहर मोरे यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास | Javahar More biography in Marathi”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi