शेअर मार्केट मध्ये सुरवात कशी करायची | How to star investment in share market in marathi

 मला शेअर मार्केट बदल काहीच माहिती नाही , शेअर मार्केटमध्ये कुठून सुरुवात करू ? माझ्याकडे पैसे नाहीत पण मला शेअर मार्केट मध्ये शिकायचा आहे काय करू ? मी शेअर मार्केट मधून रोज खरेच पैसे कमवू शकतो का ? शेअर मार्केट जुगार आहे का ?

             मित्रांनो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण हे आर्टिकल मध्ये बघणार आहोत .

             शेअर मार्केट मधून खरंच रोज पैसे कमवता येतात का ? 

हो तुम्ही रोज शेअर मार्केट मधून पैसे कमवू शकता माझे अनेक मित्र आहेत जे की शेअर मार्केट मधून चांगले पैसे कमवत आहेत , पण ते कधी , जेव्हा ह्या आर्टिकल मध्ये सांगितलेल्या पाच मुद्द्यांची तुम्ही तंतोतंत पालन करा.

               नवीन लोकांना ही माहिती खूपच फायदेशीर ठरणार आहे शिवाय अनुभवी लोकांना पण आपण कुठे चुकत आहोत , हे समजणार आहे कारण हे पाच मुद्दे मी माझ्या शेअर मार्केट मध्ये सामील असलेल्या सगळ्या मित्रांचा अनुभव घेऊन तयार केला आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचायला विसरू नका.

१). शेअर मार्केटचे सखोल नॉलेज संपादन करणे :-

                     मित्रांनो हा साधा विचार करा की आपल्याला वीस हजाराची नोकरी मिळवण्यासाठी पंधरा वर्ष शिक्षण घ्यावं लागतं मग शेअर मार्केट मध्ये काहीही न शिकता अन्याय न घेता घेता आपल्याला पैसे कसे कमवता येतील का नाही ना त्यामुळे 90 टक्के लोक यांचे शेअर मार्केटमध्ये नुकसान होते त्यांचे कारण म्हणजे ही लोकं कोणतेही नॉलेज न घेता शेअर मार्केट मध्ये पैसे कमविण्याचा प्रयत्न करतात आणि जंगलात यांचा लोप होतो तेव्हा ते म्हणतात की शेअर मार्केट मध्ये नुकसान होते ते सांगतात की शेअर मार्केट जुगार आहे.

                     त्यामुळे ही बाब नीट समजून घ्या शेअर मार्केट हे जुगार असे लोकांसाठी आहे ज्यांना कोणतही नॉलेज घेता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहे शेअर मार्केटचे जादूगर म्हणणारे वॉरेन बफेट रोज सात ते आठ तास वाचन करायचे नॉलेज संपादन करायचे म्हणून ते आज जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे त्यामुळे नॉलेज न घेता तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरायचा विचार करत असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या हाताने नुकसान करायची तयारी करत आहात.

                     आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शेअर मार्केटचे नक्की ज्ञान घ्यायचे तर कुठून पण सुरुवात पण कुठून करायची ? सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केट मधले जे इंडेक्स आहे सेन्सेक्स  आणि निफ्टी त्याबद्दल माहिती द्या सेन्सेक्स मध्ये टॉप ३० कंपन्या असतात , त्या कंपनीची माहिती घ्या. निफ्टी मध्ये टॉप ३० फिफ्टी कंपन्या असतात त्या कंपन्यांची माहिती घ्या . इक्विटी शेअर्स , बायिंग आणि सेलिंग स्टॉप लॉस , टारगेट , लॉंग टर्म , शॉर्ट टर्म , डिलिव्हरी , डिमॅट अकाउंट असा अनेक विषयांची सखोल माहिती घ्या . 

२). कुठल्याही फुकट मिळणाऱ्या टिप्स किंवा अडविसरी वर विश्वास ठेवू नका .

              मित्रांनो जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरतात तेव्हा तुम्हाला असे अनेक लोक अधलुन येतील,  जे तुम्हाला शेअर मार्केट बद्दल ऑफर टिप्स , कोणता शेअर विकत घ्यावा याबद्दल सल्ले देण्यासाठी तयार असतील.

              इथे विचार करण्याची गोष्ट आहे , की जर एखाद्याला खरंच चांगलं इन्वेस्टमेंट किंवा ट्रेडिंग  करता येत असेल तर तो दुसऱ्यांना सांगण्याची स्वतः पैसे कमवू सिमेंट नाही होणार असल्या लोकांचा उद्या तुमच्याकडून शेवटी पैसे उकळणे हाच असतो.

              सुरुवातीला तुम्हाला मोफत कॉल देतात आणि नंतर पैसे काढून घेण्यात असले लोक पटाईत असतात , त्यामुळे असल्या मोफत  आणि निरर्थक मिळणाऱ्या सल्याना अजिबात बळी पडू नका . पण तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती शेअर मार्केट मध्ये अनेक वर्ष झालं आहे , एक्सपर्ट आहे आणि तो चांगले कॉल काढून देऊ शकतो , मग त्यांनी दिलेले कॉल एक दोन महिने पेपर ट्रेडिंग करून बघा, पेपर काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत , पेपर ट्रेडिंगचे ८०% कॉल्स यशस्वी झाले की मग त्याचे कॉल्स करायला हरकत नाही .

३).  तुम्हाला शेअर मार्केट मध्ये काय बनायचे आहे इन्वेस्टर की ट्रेडर हे आधी ठरवा :- 

                  मित्रांनो शेअर मार्केट मध्ये दोन प्रकारची लोक काम करत असतात एक इन्वस्टर आणि दुसरा ट्रेडर्. 

                  इन्वेस्टर म्हणजे दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच लॉंग टर्म साठी शेअर विकत घेतात , त्यांचा उद्देश हाच असतो की काही वर्षांनी त्यांच्या इन्वेस्टमेंट वर चांगले रिटर्न मिळाले पाहिजे , म्हणजे बँक मध्ये किंवा दुसर्‍या ठिकाणी कुठे पैसे गुंतवणे ऐवजी चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले की त्यांचे रिटर्न्स बाकीच्या पेक्षा चांगला पटीने भेटतात.  मी स्वतः इन्वेस्टर आहे , मी नेहमी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन ठेवतो कारण मला रोज ट्रेडिंग करणं शक्य नाही .

                  दुसऱ्या प्रकारचे लोक ही ट्रेडर्स असतात हे खूप कमी कालावधीसाठी पैसे गुंतवतात तुम्ही ट्रेडिंग मध्ये मार्जिन चा वापर करून कमी पैशांमध्ये जास्त शेअर घेऊ शकता .

                  पण इन्वेस्टमेंट मध्ये तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात. ट्रेडिंग मध्ये खूप रिस्क असते. इन्व्हेस्टमेंट मध्ये रिस्क थोडी कमी असते.

                  शेअर मार्केटचे किंग वॉरेन बफेट यांनी सुरुवात इन्वेस्टर म्हणूनच केली. एक्सपर्ट म्हणतात कि या चार्ट प्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे .

                 हा चार्ट सांगतो की तुम्ही सुरुवात नेहमी इन्व्हेस्टमेंट पासून करावी ज्यामध्ये आपण इक्विटी शेअर्स पूर्ण पैसे देऊन विकत घेऊ शकतो , याचा कालावधी अनियमित असतो तुम्ही कितीही दिवस हे शेअर्स घेऊन ठेवू शकता . इन्वेस्टमेंट मध्ये चांगला अनुभव आला की तुम्ही नंतर शॉर्ट ट्रेडिंग करू शकता ज्यामध्ये तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करू शकता या ट्रेडिंग चा कालावधी एक आठवडा ते एक महिना पर्यंत असतो हे ट्रेडिंग इंत्राडे ट्रेडिंग पेक्षा सुरक्षित मानले जाते.

                  आणि शेवटी येते इंट्राडे ट्रेडिंग वरील दोन स्टेप मध्ये चांगला अनुभव आल्यानंतर करायची असते आणि ते पण मोठी रक्कम वापरून. इंट्राडे ट्रेडिंगचा कालावधी फक्त एका दिवसाचा असतो.

                  मित्रांनो बरीच लोकं शेअर मार्केट मध्ये सुरुवात इंट्राडे पासूनच करतात जी गोष्ट सर्वात शेवटी करायची असते आणि त्यापासूनच जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही कसे यशस्वी होतात शेअर मार्केटमध्ये एक्सपर्टस काय सांगतात की या बद्दलची माहिती दिली आहे आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला इन्वेस्टर होयच आहे की ट्रेडर. 

४). पेपर ट्रेडिंग :- 

                     मित्रांनो जर तुम्ही ट्रेडर म्हणून शेअर मार्केटमध्ये सुरुवात करत असाल तर पेपर ट्रेडिंग खूप महत्त्वाचा आहे.

                     पेपर ट्रेडिंग म्हणजे रोज पेपर वर तुम्ही शोधलेल्या कंपन्या आणि त्यांचे टारगेट लिहून काढणे आणि दिवसाच्या शेवटी बघणे की तुम्ही लावलेले किती टार्गेट हिट होतात जेव्हा तुमचा पेपर ट्रेडिंगचा रेशो 80% च्या वर जायला सुरुवात होते म्हणजे तुमचे 80 टक्के कंपन्यांचे टारगेट हिट्स व्हायला लागतात तेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तयार झाला आहात असे समजावे.

                     एक्सपर्टस सांगतात सुरुवातीला तुम्ही दोन ते तीन महिने पेपर ट्रेडिंग केली पाहिजे आणि जेव्हा एक महिना सलग तुमचे कॉल्स 80% च्यावर हिट होतात तेव्हा तुम्ही खरच शेअर मार्केटमध्ये उतरा .

५).  संयम पाळणे:-

                    मित्रांनो 95 टक्के लोक शरण येताच या हेतूने त्यांना वाटते की मी इथे झटपट श्रीमंत होईल तिथे लवकर पैसे कमवता येतील , आणि ह्या झटपट पैसे मिळवण्याच्या नादात त्यांचे खूप मोठे नुकसान होते.

                    तुमच्या मध्ये सुद्धा संयम ठेवण्याची होती नसेल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही जसे आपल्या शाळेत असताना वेगवेगळे विषय होते तसा शेअर मार्केट हा खूप मोठा विषय आहे त्याचा चांगला अभ्यास करून नफा कमवण्यासाठी लागतो.

                    मित्रांनो हे होते ते पाच महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही अमलात आले की शेअर मार्केटमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही अजून डिमॅट अकाउंट उघडले नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डिमॅट अकाउंट उघडुन घ्या .

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा.

                  

                  

              

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi