पॅन कार्ड सोबत आधार लिंक कसे करावे | How to link Aadhaar with Pan Card in Marathi

पॅन कार्ड सोबत आधार लिंक कसे करावे, एसएमएस पाठवून पॅनला आधारशी लिंक करणे ( How to link Aadhaar with Pan Card ,Linking PAN with Aadhaar by Sending an SMS )

पॅन कार्डसोबत आधार लिंक करणे अनिवार्य झाले आहे. कारण तुमचा आधार पॅनशी लिंक नसल्यास तुमच्या income tax return प्रक्रिया केली जाणार नाही. तसेच, जर तुम्हाला 50,000 रु.च्या वर बँकिंग व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि आधार लिंक करावे लागेल.

Income Tax Department ने taxpayers ना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे फक्त 2 स्टेपच्या प्रक्रियेद्वारे सोपे केले आहे. ज्यासाठी तुम्हाला e- filing वेबसाइटवर लॉग इन किंवा नोंदणी करण्याची काहीही गरज नाही. या सुविधेचा वापर करून कोणीही त्यांचे आधार पॅनशी लिंक करण्यासाठी करू शकतो.

पॅन कार्ड सोबत आधार लिंक कसे करावे ( How to link Aadhaar with Pan Card )

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पॅन आणि आधार ऑनलाइन लिंक सहज करू शकतात.

स्टेप 1:- पॅन कार्ड सोबत आधार लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा. ‘क्विक लिंक्स’ अंतर्गत, ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.

स्टेप 2:- आधार कार्डमध्ये नमूद केल्याप्रमाणे पॅन, आधार क्रमांक आणि नाव द्या.

स्टेप 3:- पॅन क्रमांक, आधार क्रमांक, आधारवरील तुमचे नाव आणि तुमचा मोबाइल क्रमांक यासारखे तपशील एंटर करा, आधार कार्डमध्ये जन्मवर्ष नमूद केले असल्यास चौकोनावर टिक करा आणि तुमचा आधार तपशील update करण्यासाठी तुम्ही सहमत आहात त्या बॉक्सवर टिक करा. ‘Link Aadhaar’ वर क्लिक करा.

स्टेप 4:- कॅप्चा कोड प्रविष्ट करा. (दृश्‍यहीन वापरकर्ते कॅप्चा कोडऐवजी ओटीपीसाठी विनंती करू शकतात. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल)

स्टेप 5:- ‘Link Aadhaar’ बटणावर क्लिक करा. तुमचा पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक होईल.

एसएमएस पाठवून पॅनला आधारशी लिंक करणे ( Linking PAN with Aadhaar by Sending an SMS )

एसएमएस पाठवून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी. आपण खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे:

स्टेप 1 :- Type UIDPAN<12-digit Aadhaar><10-digit PAN> on your mobile

स्टेप 2:- 567678 or 56161 या नंबर वर पाठवा.

अश्या प्रकारे तुम्ही दोन वेगवगळ्या पद्धतीने पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक करू शकता.

FAQ

माझा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करताना मला कोणते तपशील तपासावे लागतील?

तुमचा पॅन तुमच्या आधार कार्डशी लिंक करताना, तुम्हाला आयकर वेबसाइटवर दाखवल्याप्रमाणे तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग तुमच्या आधार कार्डवरील तपशीलांशी जुळत असल्याची खात्री करावी लागेल.

माझे पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मला कोणत कागदपत्र सबमिट कराव लागेल का?

नाही, तुमचा आधार तुमच्या पॅन कार्डशी लिंक करताना तुम्हाला कोणतीही कागदपत्रे सबमिट करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला वेबसाइटवर नमूद केलेली पॅन माहिती तुमच्या आधार कार्डशी जुळते का ते तपासावे लागेल आणि नंतर ते लिंक करण्यासाठी अर्ज करावा लागेल.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi