Diwali business idea in marathi | दिवाळी बिझनेस आयडिया मराठी मध्ये

                 मित्रांनो आज आपण असे पाच व्यवसाय बघणार आहोत जे तुम्हाला चांगले पैसे कमवून देतील , फक्त तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल आणि ते सर्व व्यवसाय माझ्या मित्रांनी  आणि नातेवायकणी केले आहेत आणि भरपूर पैसे कमावले आहेत.

                त्यामुळे हे व्यवसाय चालते की नाही याबद्दल शंका अजिबात घ्यायची नाही.

१) दिवाळीचा फराळ किंवा फराळाला लागणारे साहित्य त्याचा व्यवसाय :- 

            मित्रांनो आता बऱ्यापैकी लॉक डाऊन  संपल्यामुळे सर्व कार्यालय उघडले आहे आणि शहरांमध्ये अनेक महिला नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ करण्यासाठी वेळच नसतो. त्यामुळे अशा परिवाराला तुम्ही स्वादिष्ट दिवाळीचा फराळ जसे की शंकरपाळ्या , चकली , लाडू , चकली , चिवडा असे वेगवेगळे पदार्थ रेडिमेड देण्याची व्यवस्था केली तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

            माझ्या ओळखीतल्या महिलांनी ऑल रेडी दिवाळीचा फराळ बनवण्याचा व्यवसाय चालू केला आहे , आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळत आहे , याशिवाय तुम्ही दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे पीठ जसे की चकलीचे पीठ , अनारशी बनवण्यासाठी लागणार पीठ , चालली बनवण्यासाठी लागणारी सामग्री सुद्धा विकू शकता. कारण हे पीठ तयार करण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि खूप झंझट असते त्यामुळे बऱ्याच वेळा हे पीठ किंवा सारण विकत आणायला लोक पसंत करतात , त्यामुळे जर तुम्ही ही त्यांची रिमांड पूर्ण करू शकाल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता , आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता घरोघरी जाऊन लोकांना विचारण्याची गरज नाही तुमच्या फेसबुक वर , व्हाट्सअप ग्रुप वर , व्हाट्सअप स्टेटस वर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करू शकता आणि ह्या खाण्याच्या पदार्थामध्ये  ५०%पेक्षा जास्त प्रॉफिट असतो .

 २) घरीच गिफ्ट बॉक्स तयार करून विकणे :-

               हा गिफ्ट बघा ज्यामध्ये ग्रीटिंग कार्ड आहे चार नक्षीदार पणत्या आहेत अशा वस्तूंचे आपण जरा किंमत काढणे म्हणजे त्यामुळे आपल्याला काय कळलं की त्याच्यापासून आपल्याला किती रुपयांचा फायदा होऊ शकतो.

               ग्रीटिंग कार्ड :- ५० रुपय 

               चार पंत्या :- २० रुपय

               गिफ्ट बॉक्स :- १० रुपय

               टोटल :- ८० रुपय

आता बघा हा सेट अमेझॉन वर कितीला विकला जातो , ३९९ ला जवळजवळ दुप्पट ती ती ती किमतीमध्ये हा सेट तुम्ही अजून आकर्षक बनवला तर तो एक हजार ते बाराशे  घेतला जाऊ शकतो.

            हे उदाहरण मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी दिलं , अशा प्रकारे तुम्ही तुमचे कौशल्य वापरून अनेक वेगवेगळे गिफ्ट बॉक्स बनून भरपूर नफा कमवू शकता ,  युट्युब वर सुद्धा तुम्हाला अशा अनेक आयडिया मिळतील . याशिवाय तुम्ही ड्राय फूड गिफ्ट बॉक्स सुद्धा तयार करू शकता . दिवाळीमध्ये बऱ्याच कंपन्या आपल्या कामगारांना अशा ड्रायफूट चे बॉक्स गिफ्ट म्हणून देतात.

             तुम्हाला होलसेल मध्ये बॉक्स घेऊन यायचे आहेत त्यामध्ये थोडे काजू बदाम मनुके एकदम आकर्षक वाटतील अशा प्रकारे ठेवायचे आहेत . तेथे प्रोडक्शन कॉस्ट  जास्त लागेल पण नफा सुद्धा तेवढाच जास्त कमवल .Lic एजंट , किराणा दुकनदाराला आपल्या नियमित ग्राहकांना असे काही गिफ्ट द्यावे लागतात.

            त्यामुळे तुम्ही असा बिझनेस मधल्या लोकांना संपर्क करून त्यांच्याकडून मोठी ऑर्डर मिळू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला जे दुकानदार आहे त्यांना थोडे कमिशन देऊन तिथे सुद्धा विकण्यासाठी तुम्ही तेथे ठेवू शकता .

३) डेकोरेशनचे साहित्य आणि लाइटिंग चा व्यवसाय :-

             मित्रांनो दिवाळीच्या काही दिवस आधी प्रत्येक जण आपल्या घराची साफसफाई करतात . अनेक लोक घराला नवीन रंग देतात , यावर्षी लॉकाऊन असल्यामुळे साफसफाई करून  रंग खूप कमी लोक देतील , पण साफसफाई प्रत्येक घरांमध्ये होतेच आणि साफसफाई झाल्यानंतर प्रत्येकाला आपले घर दिवाळीमध्ये सजवायचे असते . त्यासाठी लागते लाइटिंग आणि डेकोरेशनचे सामान आणि लोकांची ही गरज जर तुम्ही पूर्ण करू शकला तर तुमचा खूप चांगला फायदा होऊ शकतो.

             मित्रांनो या वर्षी कोरोनामुळे खूप लोक घराबाहेर पडणार नाही त्यामुळे ते बाजारांमध्ये जाऊ जाऊन लाइटिंग आणि डेकोरेशनचे सामान आणण्याची शक्यता कमी आहे . त्यामुळे तुमच्या आजूबाजूला सोसायटीमध्ये , चाळी मध्ये लोकांना लाइटिंग आणि डेकोरेशनचे सामान देऊ शकाल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. होलसेल मार्केटमध्ये या लायटिंग आणि डेकोरेशनच्या सामान तुम्हाला खूप कमी दरात मिळतील उदाहरण द्यायचं झालं तर डेकोरेशनच साधं स्टिकर तुम्हाला चार ते पाच रुपयांमध्ये तुम्ही ते वीस ते तीस रुपयांमध्ये सहज विकू शकता.

             सांगायचा मुद्दा हा की लाइटिंग आणि डेकोरेशन च्या सामाना  मध्ये सुद्धा मार्जिन खूप असते , त्यामुळे दहा ते पंधरा दिवसात तुम्ही खूप चांगला नफा कमवू शकता फक्त महिनतिची गरज आहे.

४) पणत्या देवी लक्ष्मी ची मूर्ती , गणपती बाप्पांच्या छोट्या मुर्त्या विकण्याचा व्यवसाय :-

         मित्रांनो तुम्हाला थोडा विश्वास ठेवा ला अवघड जाईल पण माझ्या नात्यांमधल्या एक महिला आहेत , त्या सिटीमध्ये राहता त्या दर वर्षी आठ ते दहा दिवस पणत्या , देवी लक्ष्मी च्या मुर्त्या , गणपती बाप्पा च्या मुर्त्या , किल्ल्यावर लागणाऱ्या मुर्त्या विकण्याचा व्यवसाय करतात आणि दहा ते पंधरा दिवसांमध्ये 60 ते 80 हजारांची कमाई करून घेतात . कारण प्रत्येक घरामध्ये पाच ते सहा पणत्यांची गरज असते लक्ष्मीपूजन करण्यासाठी लक्ष्मीची मुर्ती पुजण्यासाठी लागतेच बरोबरच गणपती बाप्पांची मूर्ती लागते आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना किल्ल्यांवर ठेवण्यासाठी आठ ते दहा मुर्त्या तर हमखास लागतात त्यांना आपण मावळे म्हणतो .

         त्यामुळे मित्रांनो होलसेल मधून मूर्ती आणून तुमच्या परिसरामध्ये स्टॉल लावून विकू शकला तर तुम्ही खूप चांगला नफा करू शकता बघा .

५) फुल विकण्याचा व्यवसाय :- 

               मित्रांनो दिवाळी हा सण असा आहे की या काळामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक दिवशी फुलांची गरज लागतेच मग ते धनतेरस असो धनाची पूजा करण्यासाठी , लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी , चतुर्थीला सकाळी पहाटे आपल्या कुलदेवतेची पूजा करण्यासाठी , सांगायचा मुद्दा हा की या पाच दिवसांमध्ये फुलांची खूप चांगली मागणी असते आणि ही मागणी तुम्ही पूर्ण करू शकला तर फक्त पाच दिवसांमध्ये तुम्ही खूप चांगला नफा कमवू शकता.

               तुम्हाला तीन ते चार मित्रांना एकत्र यायचा आहे तुमच्या आजूबाजूला सोसायटी असतील चाळी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फुले आम्ही पुरू शकतो असे प्रत्येक सोसायटीमध्ये चाळीमध्ये सांगा प्रत्येक सोसायटीमध्ये 400 ते 500 फ्लॅट असतात . प्रत्येक घरामध्ये अर्धा ते एक किलो फुलांची गरज लागते , त्यामुळे तुम्हाला फक्त दोन ते तीन फुलांचे शोधावे लागतील . थोडी मेहनत त्यांनी व्यवस्थित नियोजन केले की हा व्यवसाय सुद्धा चांगला नफा करून देऊ शकतो.

               मित्रांनो हे होते ते पाच व्यवसायाचे दिवाळीमध्ये तुम्हाला खूप चांगला नफा करून देतील ही माहिती जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi