Business Figure Steve Jobs biography in marathi | स्टीव्ह जॉब्स यांचा प्रेरणादयी जीवन प्रवास मराठी मध्ये

नमस्कार मित्रानो सर्वांचं आमच्या वेबसाईट fabengineerr.co.in वर मनापासुन स्वागत ,

आज आपण Steve Jobs यांच्याबद्दल माहिती तुम्हाला देणार आहोत , चला तर त्यांच्या बदल जाणुन घेऊयात.

परिचय :-

Steve Jobs यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ ला कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को मध्ये झालं होता. त्यांचं वास्तविक नाव Steven Paul Jobs होत , जे की त्यांना त्यांच्या दत्तक घेणाऱ्या वडलांकडून ( Paul Jobs ) मिळालं होत.

खरतर त्यांच्या खऱ्या आई – वडलांची आथिर्क परिस्थिती खूप खराब होती . त्यांना असं वाटायचं की त्यांच्या मुलाला त्यांच्या सारखं गरिबी मध्ये हाल अपेष्टा सहन करत जगू नये , म्हणून त्यांनी Paul Jobs यांना स्टीव जॉब्स दतक दिले .

                            Image source

स्टीव्ह जॉब्स यांचे वडील :-

स्टीव्ह जॉब्स यांच्या वाडलांच नाव Paul Jobs अस होत , ते एक इलेक्ट्रीकल वर्कशॉप चालवायचे , त्यामुळे स्टीव्ह जॉब्स यांचा जास्त वेळ त्यांच्या वडलांना मदत करण्यात जायचा, हेच तर ते वातावरण होत जे की स्टीव्ह यांना बरोबर वस्तु जोडून नवीन उपयोगी वस्तु तयार करायचं शिकले .

प्राथमिक विद्यालया मध्ये चार वर्ष शिकल्यानंतर , त्यांच्या वडलांना काही कारणास्तव दुसऱ्या शहरात लॉस एटलास , कॅलिफोर्निया मध्ये शीफ्ट व्हावं लागलं , स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांचं Home Stead High School मध्ये एडमिश केलं. जिथं त्यांची भेट स्टीव्ह वारणेक्स सोबत झाली, जे की पुढे जाऊन Apple कंपनी मध्ये भागीदार झाले .

स्टीव्ह जॉब्स यांचं शिक्षण :-

स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांचं हाई स्कूल Home Stead High School मधून केलं. त्यांचं स्कूल मधल शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुढच शिक्षण चालू ठेवण्यासाठी कॉलेज मध्ये एडमिशन तर घेतल पण त्या कॉलेज ची फी इतकी ज्यास्त होती की त्यांच्या आई वडिलांना ती फी भरण नव्हत आणि स्टीव जॉब्स यांना पण आपल्या आईवडलांचे पैसे वाया घालवायचे नव्हते , कारण त्यांना पुढे शिकण्यात जास्त इंट्रेस नव्हता . त्यामुळे त्यांनी ६ महिन्यानंतर कॉलेज सोडलं

त्यानंतर त्यांनी आपल्या आवडत्या calligraphy च क्लास घ्यायला सुरवात केली . ही अशी वेळ होती की स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे काहीच पैसे नसायचे , त्यांच्याकडं त्यांच्या हॉस्टेल ची फी पण भरायला नव्हते त्यामुळे ते त्यांच्या मित्राच्या रूम मध्ये फरशीवर झोपायचे , आठवड्यातून एकदातरी पोटभर जेवता यावं म्हणून ते जर रविवारी  ७ km चालत मंदिरात जायचे .

स्टीव्ह जॉब्स यांची पहिली नोकरी :-

काही काळा नंतर त्यांना १९७२ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांना त्यांची पहिली नोकरी व्हिडिओ गेम बनवणारी कंपनी ATARI मध्ये मिळाली .

प्रत्येक माणसाचा अध्यात्मिक भाग असतो , प्रत्येक जण तो वेगवेगळ्या मार्गांनी मिळवतात . तसेच स्टीव्ह जॉब्स यांचं अध्यात्मिक स्थान भारत होत , त्यासाठी त्यांनी पैसे बचत करायला सुरवात केली .

सन १९७४ मध्ये ते आपल्या मित्रासोबत भारतात आले , भारतात ते ७ महिने राहिले , आणि ते बौद्ध धर्माबद्दल वाचलं आणि समजून घेतल , त्यानंतर ते परत अमेरिकेमध्ये निघून आले .

परत आल्यावर त्यांनी ATARI कंपनीमध्ये काम करण्यास सुरवात केली.

Apple चा शोध :-

स्टीव्ह जॉब्स आणि Steve Wozniak त्या दोघांनी मिळून काम करायचं ठरवलं , त्या दोघांनी कॉम्पुटर बनवायचं ठरवलं.

त्यांच्या वडिलांच्या गॅरेज मध्ये त्यांनी त्यांच्या स्वप्नांना हकीकत मध्ये बनवल . त्यावेळी स्टीव्ह जॉब्स यांचं वय २१ होत, आणि ह्या कामाला पुढं चालू ठेण्यासाठी त्यांना इंटेल कंपनीचे रिटायर्ड इंजिनिअर     Mike Murculus यांच्यापासून काही राशी मिळाली.

खूप महिने ती नंतर त्यांनी त्यांचा पहिला कम्प्युटर सेंट फ्रान्सिस च्या Homebrew कंप्यूटर क्लबमध्ये जाहीर केला. जिथे की लोकांना ते कोणतरी फार आवडले.

त्यानंतर 12 डिसेंबर 1980 मध्ये पहिल्यांदा कंपनीचा आयपीओ बाजारामध्ये आणला गेला , त्यामुळे तिथून ॲपल कंपनी ही सार्वजनिक कंपनी बनली ह्या जगातल्या कुठल्याही कंपनी पेक्षा जवळ जवळ 300 लोकांना रातोरात करोडपती बनवले.

त्यानंतर एप्पल थर्ड आणि Lisa dekstop स बाजारांमध्ये लाँच झाले तेव्हा लोकांनी जास्त इंटरेस्ट त्या कॉम्प्युटरमध्ये दाखवला नाही आणि कंपनी पूर्णपणे लॉस मध्ये गेली दुर्भाग्याने स्टीव्ह जॉब्स यांना ठरवले गेले आणि 17 सप्टेंबर 1985 मध्ये स्टीव्ह जॉब यांना कंपनी मधून काढून टाकले.

स्टीव जॉब्स सीईओ of Apple  :-

Apple मधून काढून टाकल्यानंतर ते एकदम मायुस झाले ते  खूप दुःख झाले होते तरीपण त्यांनी हिम्मत सोडली नाही आणि NEXT नावाची कंपनी उघडली , त्या कंपनी मधून त्यांनी इतका पैसा मिळवला की त्यांनी १० million dollar नी ग्राफिक्स कंपनी विकत घेतली , त्या कंपनीचं नाव त्यांनी Pixar ठेवलं,  त्यात त्यांनी चांगली प्रगती केली .

इकडे स्टीव्ह जॉब्स विना ॲपल कंपनी लॉस मध्ये चालली होती , तेव्हा ॲपल कंपनीचे ४७७ million dollar नी NEXT कंपनी विकत घेतली , आणि  स्टीव्ह जॉब्स तेव्हा ॲपल चे सीईओ झाले .

त्यानंतर त्यांनी ॲपल चे अनोखे प्रोडक्ट्स बनवले , जस की आयपॉड, itune, आणि २००७ मध्ये ॲपल कंपनीचा पहिला फोन बाजारामध्ये आला आणि त्या फोन ने बाजारात नवीन क्रांती घडवली . 

स्टीव जॉब्स day :-

5 ऑक्टोंबर 2011 मध्ये मात्र 56 वर्षाच्या वयात कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी कॅलिफोर्नियाच्या राज्यपालाला द्वारे त्या दिवसाला स्टीव जॉब्स day म्हणून जाहीर केले.

मित्रांनो जर तुम्हाला हे आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा .

Think Different                                                                                  steve Jobs.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi