गरजेच्या वेळी लोकांना मदत करणारे आनंद महिंद्रा जी यांचा सक्सेस च्या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास आज आपण पाहणार आहोत.
श्री आनंद महिंद्रा जी ( महाराष्ट्र ) :-
Table of Contents
एका व्यक्तीला जर काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर तो लाखो लोकांच्या गर्दीमध्ये पण तो आपली जागा बनवु शकतो . या वाक्याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे उद्योगपती आणि महेंद्रा ग्रुपचे चेअरमन श्री आनंद महिंद्रा जी.
आनंद महिंद्रा यांना विरासत मध्ये एक नामवंत बिझनेस मिळाला , पण आपल्या कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर सन 1997 मध्ये त्यांनी कंपनीचा प्रबंध निर्देशक होण्याचा गौरव मिळवला.
त्यानंतर त्यांनी परत मागे वळून बघितले नाही एक बिझनेस मॅन असून देखील समाजसेवा आणि गरजूंना मदत करून त्यांनी आपली अनोखी ओळख बनवली आहे . महिंद्रा ग्रुप ला त्याच्या उंच शिखरावर पोचवणारे आनंद महिंद्रा यांचा जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आज आपण पाहणार आहोत .
M & M कंपनीची सुरवात :-
भारताचे नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा जन्म 1 मे 1995 मध्ये महाराष्ट्रामधील मुंबई मध्ये एका नामवंत व्यवसायही परिवारामध्ये झाला .
आज श्री आनंद महिंद्रा जी यांचा ऑटो जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे . आनंद महिंद्रा यांचे आजोबा जेसी म्हणजे जगदीश चंद्र महिंद्रा यांनीच M & M ग्रूप्स कंपनीची सुरुवात केली.
सुरवातीमध्ये या कंपनीचं नाव महिंद्रा अँड मोहम्मद अस होतो , कारण जेसी महिंद्रा चे पार्टनर मालिक मोहम्मद गुलाम होते. भारत विभाजन झाल्यानंतर मालिक मोहम्मद गुलाम हे पाकिस्तान मध्ये निघून गेले , आणि पाकिस्तानचे पहिले फायनान्स मिनिस्टर बनले .
त्याच्यानंतर जेसी महिंद्रा यांनी या बिजनेस ला आपल्या भावासोबत म्हणजेच कैलासचंद्र महिंद्रा सोबत महिंद्रा अँड महिंद्रा नावाने सुरुवात केली.
पंजाब मधल्या लुधियाना मध्ये त्यांचे आजोबा जगदीश चंद्रजी आणि केला चंद्रजी यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पाया रचला . आनंद महिंद्रा यांना हा बिजनेस विरासत मध्ये मिळाला होता .
त्यांच्या आजोबांनंतर त्यांचे वडील हरिष महिंद्रा जी आणि त्यांची आई इंदिरा महिंद्राची हा व्यवसाय सांभाळत होत्या शिक्षण पूर्ण केल्यानंतर आनंद महिंद्रा जी पण आपल्या खानदानी व्यवसायांमध्ये जोडले गेले .
आनंद महिंद्रा यांचे शिक्षण :-
श्री आनंद महिंद्रा जी हे सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये हुशार होते . सन 1977 मध्ये आनंद महिंद्रा जीनी अमेरिकेच्या हॉवर्ड कॉलेज , डिपार्टमेंट ऑफ विजुयाल अंड enviromental स्टडीज मधून ग्रॅज्युएशन केले , त्याच्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हवड बिझनेस स्कूल मधून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ची डिग्री घेतली.
एमबीए चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1981 मध्ये आनंद महिंद्रा जी भारतात परत आले आणि त्यांनी इथे महिंद्रा यू जोईन स्टील कंपनी मध्ये वित्त निदेशक कार्यकारी सहाय्यक रूपामध्ये आपला पहिला कार्यभार सांभाळला .
त्यांनी लवकरच आपल्या कौशल्य आणि होणार च्या दमावर 1997मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रबंध निर्देशक म्हणून पदभार सांभाळा त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही 2003 मध्ये आनंद महिंद्रा कंपनीचे चेअरमन बनले . इथूनच त्यांनी कोटक महिंद्रा न्यू ची सुरुवात केली.
आनंद महिंद्रा समाजसेवक भूमिकेत :-
आनंद महिंद्रा जी जेवढे चांगले बिझनेस मॅन आहेत तेवढे चांगले ते समाजसेवक पण आहेत आनंद महेंद्रजी नेहमीच लोकांची मदत करत असतात त्यांनी केलेले मतदान आणि चांगले काम नेहमी चर्चेमध्ये असतात .
त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत प्राईज फॉर गुड प्रोग्राम सुरू केला यामध्ये खूप मुद्द्यांवर काम होत आहे ज्यामध्ये आरोग्यापासून ते पिण्याच्या साप पाण्यापर्यंत असे काही मुद्दे आहेत.
कमजोर आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांना या प्रोग्रॅमद्वारे थेट जोडले जाते , एवढेच नाही तर एक रिक्षा ड्रायव्हर सोशल डिस्टंसिंग च्या पालन करण्यासाठी आपल्या रिक्षामध्ये मोठे प्लास्टिकच्या मदतीने चार विभागांमध्ये विभागलेले होते , एवढेच नाही तर ड्रायव्हर सीट पण दुसर्या पासून वेगळी केली होती .
हे पाहून महिंद्रा ट्विटरवर शेअर करत एम & एम मध्ये ऑटो अंड फर्म सेक्टर च्या डायरेक्टर राकेश जेजुरीकर ला ट्विटमध्ये टॅग करत महणाले की , या रिक्षाचालकाला आपल्या रेसर्च एंड development विभागांमध्ये सह्याक महनुन नियुक्त केले .
आनंद यांना मिळालेले सत्कार :-
नेहमी लोकांना मदत करणारे श्री आनंद महिंद्रा यांना अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे.
• 2004 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’, ‘राजीव गांधी पुरस्कार’ .
• 2005 मध्ये ‘पर्सन ऑफ द इयर’, ‘ऑटो मॉनिटर’ आणि 2005 मध्ये अमेरिकन इंडिया फाउंडेशनचा ‘लीडरशिप अवॉर्ड’
• 2006 मध्ये ‘सीएनबीसी एशिया’ लुधियाना मॅनेजमेंट असोसिएशनचा ‘बिझनेस लीडर’ पुरस्कार, ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्कार
• 2007 मध्ये एनडीटीव्ही नफ्याकडून ‘मोस्ट इन्स्पिरेशनल कॉर्पोरेट लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार,
• 2008-2009 मध्ये बिझनेस लीडर म्हणून ‘इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड’ इ. पुरस्कार देण्यात आला आहे.